सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यप्रतिमेची यू.ए.एस्. निरीक्षणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत सूर्यदेवतेची प्रतिमा लावण्यात आली आहे. या सूर्यप्रतिमेला रंग देण्यात आला. तत्पूर्वी सूर्यप्रतिमेचे रंग देण्यापूर्वी आणि रंग दिल्यानंतर त्यामध्ये झालेले पालट अभ्यासण्यात आले. हे पालट ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’द्वारे अभ्यासून त्याची नोंद घेण्यात आली. याचसमवेत सूर्यप्रतिमेचे सूक्ष्म परीक्षणही करण्यात आले. या दोहोंचे विश्लेषण येथे देत आहोत.
चाचणीचा निष्कर्ष : रंग दिल्यावर सूर्यप्रतिमेतील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.७.२०२३)
सूर्यप्रतिमेचे केलेले सूक्ष्म परीक्षण
१. सृष्टीमध्ये कार्यरत असणार्या पंचतत्त्वांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याशी संबंधित देवता
टीप – ‘सूर्य’ हा तेजाच्या व्यापक, समष्टी आणि सगुण, तर ‘अग्नि’ हा तेजाच्या लघु, व्यष्टी अन् सूक्ष्म रूपांचे प्रतीक आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यप्रतिमेच्या संदर्भात केलेले संशोधन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यप्रतिमेत नकारात्मक स्पंदने आढळण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : सूर्यदेवतेमध्ये ‘आकर्षण’ आणि ‘प्रक्षेपण’ या दोन प्रकारच्या शक्ती कार्यान्वित असतात. जेव्हा त्याची आकर्षण शक्ती कार्यरत असते, तेव्हा वातावरणात नकारात्मक स्पंदने सूर्यप्रतिमेकडे आकृष्ट होतात आणि जेव्हा त्याच्यामध्ये प्रक्षेपणाची क्षमता जागृत होते, तेव्हा त्याच्याकडून संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा अन् चैतन्य यांचे प्रक्षेपण होते. सूर्यदेवतेतील ‘आकर्षण’ शक्तीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यप्रतिमेकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाच्या सावटामुळे निर्माण झालेली आणि वातावरणात कार्यरत असणारी नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाली. त्यामुळे या सूर्यप्रतिमेत नकारात्मक ऊर्जा आढळली.
२ आ. सूर्यप्रतिमेला रंग दिल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : कोणत्याही वस्तूचा आकार हा सगुण आणि तिचा रंग हा सगुण-निर्गुण तेजतत्त्वाशी संबंधित असतो. किंबहुना तेजतत्त्वामुळेच एखाद्या वस्तूला आकार आणि रंग यांनी युक्त रूप प्राप्त होते. सूर्य हा तेजतत्त्वाशी संबंधित देव आहे. त्यामुळे जेव्हा सूर्यप्रतिमेला रंग देण्यात आला, तेव्हा त्या रंगाकडे सूर्यदेवतेचे तत्त्व तेजतत्त्वाच्या स्तरावर आकृष्ट होऊन ते त्या प्रतिमेमध्ये कार्यरत झाले. या प्रतिमेमध्ये सूर्यदेवाची ‘प्रक्षेपण’ ही दैवी शक्ती कार्यरत झाली. त्यामुळे या प्रतिमेतून तेजतत्त्वाच्या स्तरावरील पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा वातावरणात प्रक्षेपित होऊन तिच्यामध्ये आकृष्ट झालेल्या त्रासदायक (काळ्या) शक्तीचे तेजतत्त्वाशी सूक्ष्मतर स्तरावर युद्ध झाले आणि प्रतिमेमधील त्रासदायक (काळी) शक्ती पुष्कळ प्रमाणात नष्ट झाली. त्यामुळे सूर्यप्रतिमेला रंग दिल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
सूर्यप्रतिमेच्या वरील उदाहरणातून दैवी शक्तींचे वाईट शक्तींशी झालेल्या सगुण-निर्गुण स्तरावरील युद्धात वाईट शक्तींचा तेजतत्त्वाच्या स्तरावर पराभव केल्याची खात्री मिळाली.’ (४.७.२०२३)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|