कायदाबाह्य विवाहातून जन्मलेली मुलेही पालकांच्या संपत्तीचे वारसदार असणार !
नवी देहली – कायदाबाह्य विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना पालकांच्या स्व-अधिग्रहित, तसेच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. केवळ हिंदु वारसा कायद्यानुसारच हा अधिकार मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.