भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् बनले सिंगापूरचे ९ वे राष्ट्राध्यक्ष !
सिंगापूर – भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षपदी बनले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या २ उमेदवारांना परातूभ केले. थर्मन यांना ७०.४ टक्के, एन्.जी. कोक संग यांना १५.७२ टक्के, तर टॅन किन लियान यांना १३.८८ टक्के मते मिळाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले. विजयानंतर थर्मन यांनी योग्य निर्णय घेतल्यासाठी सिंगापूरच्या मतदारांचे आभार मानले. दुसरीकडे पराभवाने संतापलेले टॅन किन लियान म्हणाले की, सिंगापूर निवडणुकीच्या जागी जुनी पद्धत लागू करा, ज्यामध्ये राष्ट्रपतींची निवड संसद करते. (चिनी लोकांना भारत आणि भारतीय वंशांच्या नागरिकांचे यश कधीही स्वीकारता येणार नाही, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)
भारतीय मूल के थर्मन शनमुगरत्नम बने सिंगापुर के 9वें राष्ट्रपति।
चीनी मूल के 2 विरोधियों को हराया , 70 फीसदी वोटों से जीता चुनाव।
प्रधानमंत्री मोदी ने दी बधाई। pic.twitter.com/Dwkt1itz0Z
— Panchjanya (@epanchjanya) September 2, 2023
थर्मन हे अध्यक्षपदासाठी जनतेद्वारे निवडून आलेले पहिले भारतीय, तर सिंगापूरचे भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्रपती आहेत. वर्ष १९८१ मध्ये संसदेत निवडून आलेले देवेन नायर राष्ट्रपती झाले. एस्.आर्. नाथन यांनी वर्ष १९९९ ते २०११ अशी ११ वर्षे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांची बिनविरोध निवड झाली होती. वर्ष १९९१ पासून सामान्य जनता मतदानाद्वारे राष्ट्रपतीची निवड करते.
कोण आहेत थर्मन षण्मुगरत्नम् ?
थर्मन यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५७ या दिवशी सिंगापूर येथे झाला. त्यांचे आजोबा तमिळनाडू येथून सिंगापूरमध्ये स्थायिक झाले. थर्मन यांचे वडील प्रा. के. षण्मुगरत्नम् वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. त्यांना सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक मानले जाते.
थर्मन यांच्या पत्नी जेन इटोगी या चिनी-जपानी वंशाच्या आहेत. या दांपत्याला एक मुलगी आणि ३ मुले आहेत. मुलीचे नाव माया, तर मुलांची नावे कृष्णा, अर्जुन आणि आकाश अशी आहेत.