भ्रमणभाष मागवल्यावर मिळाल्या अन्य वस्तू !
पुणे – ‘ई-कॉमर्स कंपनी’कडून ऑनलाईन भ्रमणभाष विकत घेणार्या ग्राहकांना भ्रमणभाष ऐवजी फरशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले भ्रमणभाष देण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ४ डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. आरोपींकडून ४ लाख ५१ सहस्र ४३ रुपयांचे १९ भ्रमणभाष जप्त करण्यात आले आहेत.