६५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदश्री रामेश्वर भुकन (वय १० वर्षे) हिला सनातनच्या संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
१. पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत)
१ अ. पू. संदीपदादा जवळून गेल्यावर हलकेपणा जाणवणे : ‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तिसर्या माळ्यावरून जात असतांना पू. संदीप आळशी माझ्या मागे होते. ‘ते माझ्या पुढे केव्हा गेले’, हे मला कळलेच नाही. ते जात असतांना मला हलकेपणा जाणवला.
१ आ. पू. संदीपदादांप्रमाणे ‘न्यास करून नामजप करायला हवा आणि फलकावरील चुका नियमितपणे वाचायला हव्यात’, या गोष्टी शिकायला मिळणे : जेव्हा मी तिसर्या माळ्यावर नामजपाला बसते, तेव्हा पू. संदीप आळशी तेथे असतात. त्यांची प्राणशक्ती अल्प असतांना ते नामजप होईपर्यंत न्यास करतात. त्यातून मला शिकायला मिळाले की, ‘त्यांना एवढा त्रास असूनही ते न्यास करतात, तर आपण सहज करू शकतो.’
१ इ. ते महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर फलकावरील चुका आणि सूचना नियमितपणे वाचतात.’
२. पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत)
अ. पू. दातेआजींकडे पाहिल्यानंतर मला एकदम हलकेपणा जाणवतो. शांती आणि चैतन्य यांच्या लहरी जाणवतात.
‘हे गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुम्हीच माझ्याकडून हे लिहून घेतल्याबद्दल तसेच तुमच्याच अनंत कृपेमुळे मला संतसहवास लाभतो, यासाठी कृतज्ञ आहे.’
– गुरुदेवांचे आनंदी फूल,
कु. वेदश्री रामेश्वर भुकन (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |