चीनच्या विकासाला उतरती कळा !
चीनच्या विकासाला उतरती कळा लागली आहे. त्याचा ‘जीडीपी’ (सकल देशांर्तगत उत्पादन) विकासदर ३ टक्क्यांहून अल्प आहे. ‘जीडीपी’चा बांधकाम क्षेत्राचा वाटा ३० टक्के आहे. हेही क्षेत्र कोसळले. बेकारीचा दर वाढला. अमेरिका आणि युरोप यांचा विकासदर घटत आहे आणि महागाई प्रचंड वाढत आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे हे परिणाम आहेत. यावर यशस्वी मात करून ६ टक्के ‘जीडीपी’ विकासदर ठेवणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
चीनकडून विविध देशांमध्ये जे साधनसामुग्रीच्या विकासाचे प्रकल्प चालू होतील, त्याच्यावरही याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. ‘ग्लोबल सप्लाय चेन’ मध्ये अडथळा निर्माण होईल; परंतु याचा एक सकारात्मक परिणाम असाही होऊ शकतो की, चीनच्या या आर्थिक पडझडीमुळे भारताचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: ‘ग्लोबल सप्लाय चेन’मध्ये (जागतिक पुवठा साखळीत) चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. या संधीमुळे जी एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न येत्या काळात भारताकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
(साभार : फेसबुक)