पलूस (जिल्हा सांगली) येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक संमेलन पार पडले !

पलूस (जिल्हा सांगली) – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (एम्.एस्.एम्.ई.) यांना केंद्र आणि राज्य सरकारची औद्योगिक धोरणे, प्रोत्साहनपर उद्योग वाढीसाठी योजना, विविध अनुदान, विविध योजना यांविषयी राष्ट्रीय सदस्य प्रदीप पेशकार, तसेच उद्योग मित्र संस्था संघटक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन झाले. याचा लाभ उद्योजकांनी घेतला. याचे आयोजन पलूस तालुका उद्योजक बांधव यांनी केले होते.