चंद्रपूर येथे खोदकाम करतांना पांढरे आणि काळे शिवलिंग सापडले !
चंद्रपूर – जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथे खोदकाम करतांना भूमीत २ शिवलिंग सापडले. यातील एका शिवलिंग काळ्या रंगाचे असून दुसरे पांढर्या रंगाचे आहे. हे शिवलिंग पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. याविषयी ज्येष्ठ पुरातत्व विशेषज्ञ आणि इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी म्हटले की, भोसलेशाहीच्या काळात या परिसरात अनेक हेमाडपंथी शिवमंदिरे होती. त्याचाच एक भाग म्हणून हे शिवलिंग असायला हवे.
नेरी या गावात हेमांडपंथी पार्वतीमातेचे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो. वर्षभर येथे भाविक दर्शनाला येतात. त्यामुळे ‘या ठिकाणी सभागृह असावे’, अशी भाविकांची मागणी होती. त्यानंतर आमदार निधीतून सभागृह करण्याचे काम संमत करण्यात आले. त्या वेळी खड्ड्यांचे खोदकाम करतांना दोन्ही शिवलिंग सापडले.