‘आप’चे गोवा विभागाचे प्रमुख अमित पालेकर पोलिसांच्या कह्यात
|
पणजी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – बाणस्तारी येथे मर्सिडीस वाहनाने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ‘आप’चे गोवा विभाग प्रमुख तथा अधिवक्ता अमित पालेकर यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या भीषण अपघातासाठी उत्तरदायी ठरलेल्या सावर्डेकर दांपत्याला वाचवण्यासाठी बनावट चालक सिद्ध करून त्याला म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात उपस्थित करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, या आरोपांखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
VIDEO | Goa AAP chief Amit Palekar arrested by Goa Crime Branch in connection with a road rage case. “This is absolutely dirty politics and I have got nothing to do with this crime,” says Palekar. pic.twitter.com/C14DgOB0Gf
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2023
बाणस्तारी अपघाताच्या दिवशी जी ‘ओली पार्टी’ (प्रकरण मिटवण्यासाठी देण्यात आलेली मेजवानी) झाली होती, त्यामध्ये सावर्डेकर कुटुंबियांसमवेत अमित पालेकर हेही सहभागी असल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमात फिरत आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाने ३१ ऑगस्ट या दिवशी दुपारी अधिवक्ता अमित पालेकर यांना अन्वेषणासाठी पोलिसांच्या रायबंदर येथील कार्यालयात बोलावले होते. काही वेळ अन्वेषण केल्यानंतर अधिवक्ता अमित पालेकर यांना कह्यात घेण्यात आले.