माजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना अटक !
छत्रपती संभाजीनगर येथील ‘आदर्श पतसंस्था घोटाळा’ प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – ‘आदर्श पतसंस्थे’तील २०२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पोलिसांनी माजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (वय ५७ वर्षे) यांना ३० ऑगस्ट या दिवशी अटक केली. वर्ष २०१६ ते २०१८ या कालावधीत पतसंस्थेचे लेखापरीक्षण झाले होते; मात्र खरे यांनी या लेखापरीक्षणाच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने ते या घोटाळ्याला उत्तरदायी आहेत, असा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदर्श पतसंस्था घोटाळा; तत्कालिन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला अटक
सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :https://t.co/WWdVYSs6aC— Chhatrapati Sambhajinagar City News (@acnaurangabad) August 31, 2023
पोलिसांनी खरे यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यासह १२ संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील ११ जण न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत. वनिता आणि सुनंदा या अंबादास मानकापे यांच्या सुना असून त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.