अदानी यांच्या माध्यमातून १ बिलीयन डॉलर विदेशात पाठवण्यात आले ! – राहुल गांधी, काँग्रेस
मुंबई – भाजप आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात आर्थिक हितसंबंध आहेत. भारतातील १ बिलीयन डॉलर ‘अदानी नेटवर्क’द्वारे विविध देशांत पाठवले गेले. हा पैसा पुन्हा भारतात आणण्यात आला. या पैशांतूनच अदानी देशातील विविध मालमत्तांची खरेदी करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली. मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला आले असतांना ३१ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषद घेऊन गांधी यांनी वरील आरोप केले.
VIDEO | “Gentleman who did the investigation is the employee of Mr Adani. This makes it clear that there was no probe” says Congress leader @RahulGandhi on probe related to Adani group. pic.twitter.com/YJGft1svUn
— Press Trust of India (@PTI_News) August 31, 2023
या वेळी राहुल गांधी म्हणाले,‘‘विदेशातून पुन्हा आलेल्या या पैशांमुळे अदानी यांनी त्यांच्या शेअरचे मूल्य वाढवले. यामध्ये गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी हे ‘मास्टर माईंड’ (मुख्य सूत्रधार) आहेत. यामध्ये अन्यही २ साथीदार आहेत. त्यांतील एक चीनमधील आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांद्वारे चौकशी व्हायला हवी.’’