नाशिक येथे प्रयोगशाळेतील अधिकार्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक !
नाशिक – सरकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अनुजीव साहाय्यक वैभव सादिगले यांना शहरातील एका ‘केटरिंग’ (अन्न पुरवण्याचा व्यवसाय) व्यावसायिकाला ‘पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला आहे’, असा निर्वाळा द्यायचा होता. त्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सादिगले यांना ३० ऑगस्ट या दिवशी रंगेहात पकडून अटक केली. तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था, तसेच इतर ३ संस्थांचा केटरिंगचा व्यवसाय करतात. त्यासाठी लागणार्या पाण्याच्या एकूण ४ नमुन्यांची पडताळणी होऊन त्याविषयी अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच मागण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेली प्रशासकीय यंत्रणा ! |