रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावर कु. जिज्ञासा राम धारणे (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती !
‘माझ्या आई-वडिलांनी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यासाठी प्रथमच होकार दिला. गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुमच्या अपार कृपेमुळे मी रामनाथी आश्रमात येऊ शकले. मी आश्रमात आल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. रामनाथी आश्रमात आल्यावर जणू ‘मी साक्षात् वैकुंठात आले आहे’, असा मला अनुभव आला.
२. आश्रमात आल्यावर मला ‘आश्रम हलतोय’, असे वाटायचे.
३. गुरुदेवा, सत्संगाच्या माध्यमातून तुमचे दर्शन झाले. तेव्हा तुमच्या देहातून ‘तेजस्वी प्रकाश’ निघतांना दिसत होता.
४. व्यष्टी साधनेत मी अल्प पडते, याची मला पुष्कळ खंत वाटते; पण मी व्यष्टी साधना चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे.
५. गुरुदेवा, मी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गही तुमच्याच कृपेमुळे घेऊ शकते.
‘हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेविना आम्ही काहीच नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आम्हाला लाभली’, हे आमचे अहोभाग्यच आहे ! तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. जिज्ञासा राम धारणे (वय १५ वर्षे), यवतमाळ (२.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |