मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत रक्षाबंधन साजरे !
मान्यवरांना राखी बांधण्याचा सनातन संस्थेचा उपक्रम !
मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या अंतर्गत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार कॅप्टन आर्. तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस, गुजराती वृत्तपत्र ‘जन्मभूमी’चे संपादक श्री. कुंदन व्यास, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘स्कॉड १८ केबल’चे श्री. वसंत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली.
डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.