‘सेक्स्टॉर्शन’च्या छळाला कंटाळून चिपळूण तालुक्यात १९ वर्षांच्या युवकाची आत्महत्या !
|
चिपळूण – तालुक्यातील तिवरे येथील एका १९ वर्षीय युवकाने ‘सेक्स्टॉर्शन’च्या (सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिकतेशी संबंधित घटनेचा पुरावा उघड करण्याची धमकी देऊन संबंधितांकडून पैसे उकळण्याचा प्रकार) छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ९ ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली होती. या प्रकरणी आता चिपळूण पोलिसांनी राजस्थान येथील ३ संशयित आरोपींवर गुन्हा नोंद केला आहे.
राजस्थानमधील एका टोळीने तिवरे गावातील एका युवकाला त्याचे अश्लील ‘व्हिडिओ अपलोड’ करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर त्या युवकांने संबंधितांना ११ सहस्र रुपयांची खंडणीही दिली; परंतु त्रास वाढू लागल्यानंतर त्याला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलीस अन्वेषणात समोर आली आहे.
सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून तरुणाचे टोकाचे पाऊल#janpravas #janpravaslive #latestnews #JANPRAVS_LIVE #maharashtra #maharashtranews #crime #19year #oldboy #life #sextortion #blackmailing pic.twitter.com/KrXk6bUBWG
— JanpravasLive (@JanpravasKop) August 31, 2023
या प्रकरणी राजस्थान येथील किशनराम भन्वरलाल पातीर असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. संशयित युवकाने अश्लील व्हिडोओद्वारे अलोरे येथील युवकाशी संपर्क केला, तसेच त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याद्वारे त्याला ‘ब्लॅकमेल’ करून त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ ‘यू ट्युबर’वर अपलोड करण्याची, तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी वारंवार दिली होती.
या प्रकरणाचे अधिक अन्वेषण चिपळूण तालुका पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करत आहेत.