सैन्यदलात कार्यरत असणार्यांनी कामासाठी माझ्याशी संपर्क साधावा ! – करवीर तहसीलदार
कोल्हापूर – ‘सैन्यदलात कार्यरत असणारे किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी काम असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधावा’, असा फलक करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी कार्यालयाच्या बाहेर लावला आहे. ‘आपले काम प्राधान्याने करणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो. देशसेवेसाठी आपण जे कार्य करत आहात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे’, असे त्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. लष्करी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या या वैशिष्ट्यपूर्ण फलकामुळे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. (सर्वांनी असा आदर्श ठेवल्यास ‘सरकारी काम ६ मास थांब’, हे चित्र नक्कीच पालटेल ! – संपादक)