पुणे जिल्ह्यात २ ठिकाणी बिंदूदाबन शिबिर पार पडले !
पुणे – येणारा आपत्काळ हा अत्यंत बिकट असणार आहे. अशा परिस्थितीला सक्षमपणे तोंड देता येण्यासाठी साधकांनी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांसह शारीरिक स्तरावरही सिद्ध होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांसाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड अशा २ ठिकाणी प्रत्येकी ३ दिवसांचे शिबिर पार पडले. पुणे येथे २२ ते २४ ऑगस्ट आणि पिंपरी-चिंचवड येथे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबिर पार पडले. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते. बिंदूदाबनासह निसर्गाेपचाराच्या काही उपचारपद्धतींमुळे रुग्ण साधकांना बरे वाटल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील अनेक साधकांनी घेतला.
पुणे येथील शिबिराला सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांची, तर पिंपरी-चिंचवड येथील शिबिराला पू. (सौ.) संगीता पाटील आणि पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.