औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे मूळ नाव कायम ठेवून याचिका निकाली !

छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. त्यानुसार केंद्र सरकारनेही या निर्णयाला संमती दिली होती; मात्र या विरोधात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर निकाल देतांना न्यायालयाने या दोन्ही जिल्ह्यांचे जुने नाव कायम ठेवले आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या आणि महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने काढली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान याचिका निकाली काढली.

या दोन्ही शहरांच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ आणि ५ ऑक्टोबर या दिवशी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस्. डॉक्टर यांच्या न्यायपिठात ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणी युक्तीवादाशी संबंधित कागदपत्रे आणि निवाड्यांच्या प्रती न्यायालयात जमा कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.