चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे मटण म्हणून गोमांस असलेले जेवण देणार्या हॉटेल्सवर पोलिसांची धाड !
हॉटेलच्या मालकांना अटक
मंगळुरू (कर्नाटक) – मटणाचे जेवण म्हणून गोमांसाचे जेवण देणार्या चिक्कमगळुरूतील अनेक प्रसिद्ध हॉटेल्सवर पोलिसांनी धाड घातली. पोलिसांनी ‘एव्हरेस्ट हॉटेल’चे मालक लतिफ आणि ‘बेंगळुरू हॉटेल’चे मालक शिवराज यांना अटक केली आहे. या वेळी पोलिसांनी गोमांसांपासून बनवलेले पदार्थ जप्त केले.
Karnataka: Hotel Owners Serve Beef to Customers Instead of Mutton in Chikkamagaluru District, Arrested#Karnataka #BeefControversy #Chikkamagaluru https://t.co/MIGb7J1aV6
— LatestLY (@latestly) August 30, 2023
पोलिसांनी ‘न्यामत’ या हॉटेलमधून २० किलो गोमांस जप्त केले. हॉटेल मालक इर्शाद अहमद याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.