‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर देहलीत सुशोभिकरण करतांना शिवलिंगांचा अवमान !
|
नवी देहली – देहलीत येत्या ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी जी-२० परिषदेची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सुशोभिकरण करण्यात येत आहे. धौला कुआं भागातील हनुमान चौक येथे रस्त्याच्या कडेला कारंजे उभारण्यात आले आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी ६ कारंजे उभारण्यात आले आहेत. हे कारंजे शिवलिंगाच्या आकारात आहेत. यामुळे टीका होऊ लागली आहे.
Never seen such type of mockery of any religion
How can Hindus tolerate this ?
This is same peaceful did in Gyanvapi. Converted Shiva Linga into fountain n performed Vaju on it.
These Shiva linga sud immediately be removed from there n responsible person for it sud be arrested pic.twitter.com/YgiDQYHAxH
— STAR Boy (@Starboy2079) August 30, 2023
१. भाजपच्या नेत्या चारू प्रज्ञा यांनी ट्वीट करून म्हटले की, शिवलिंग सजावटीसाठी नाही आणि धौला कुआं ज्ञानवापी नाही. आम आदमी पक्षाच्या सरकारने धौला कुआं येथे शिवलिंगाच्या आकाराचे कारंजे लावले आहेत.
२. दुसरीकडे आम आदमी पक्षाने यासाठी भाजपलाच उत्तरदायी ठरले असून शिवलिंगाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.
संपादकीय भूमिकाअन्य धर्मियांच्या धर्मश्रद्धांचा असा अवमान करण्याचे संबंधितांचे धाडस झाले नाही; कारण त्यांना त्याचे परिणाम काय होऊ शकतात ?, हे ठाऊक आहे. हिंदु स्वतःच्या धर्माविषयी निद्रिस्त असतात आणि अशा घटना ते स्वतःच करतात किंवा कुणी असे कृत्य केले, तर निष्क्रीय रहातात ! |