कल्याण येथे अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील चाळे करणार्या तरुणाला अटक !
तरुणाच्या बहिणीचीही या कृत्यात साथ
ठाणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण पूर्व भागात रहाणार्या १२ वर्षीय मुलीसमवेत अश्लील चाळे करणारा अजय थापा (वय २० वर्षे) याला आणि चित्रीकरण करून त्याला साथ देणार्या त्याच्या बहिणीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कल्याण पूर्व भागातील अशा प्रकारची ही एका मासातील चौथी घटना आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :अशांना तात्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना या घटना थांबणार नाहीत ! |