गडचिरोली येथे कामचुकार कर्मचार्यांमुळे कार्यालय केले सील !
साहाय्यक जिल्हाधिकार्यांची कारवाई !
गडचिरोली – जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील १० कामचुकार कर्मचार्यांमुळे साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी कार्यालय सील केले असून त्या १० जणांना निलंबित केले आहे. ‘कामात दिरंगाई करणे, कार्यालयात विलंबाने येणे, निष्काळजीपणा त्यांच्यात होता. १ मास वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई होताच कार्यालयाचे सील काढून कामकाज पूर्वीप्रमाणे चालू होईल’, असे वाघमारे यांनी सांगितले.
वाघमारे यांनी २४ जुलैला अहेरी येथील पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे अहेरी उपविभागीय कार्यालयासह जिल्ह्यातील ३ कार्यालयांचा कार्यभार आहे. गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कार्यालयीन कामकाजात बेशिस्त दिसून आली. वाघमारे आणि नायब तहसीलदार सकाळी ९.४५ वाजताच कार्यालयात आले; परंतु कर्मचारी नेहमीप्रमाणे विलंबाने आले. तोपर्यंत वाघमारे यांनी कार्यालयच सील केले होते.
संपादकीय भूमिका :अशा कर्तव्यचुकारांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फच करायला हवे ! |