मेवात (हरियाणा), देहली आणि मणिपूर येथे हिंदूंना लक्ष्य करून हिंसाचार करणार्यांवर कारवाई करा ! – चंदगड येथ निवेदन
चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – गेल्या काही मासांपासून एका मोठ्या षड्यंत्राद्वारे मणिपूर, देहली आणि मेवात (हरयाणा) येथे स्थानिक धर्मांध आणि राष्ट्रविरोधी लोकांकडून स्थानिक हिंदूंना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला आहे. मणिपूर अद्यापही अशांत आहे. या सर्व हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर हिंदु मारले गेले असून त्यांच्या, तसेच राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी झालेली आहे. या सर्व प्रकाराला देशविरोधी शक्तींचे साहाय्य मिळत आहे. हे सर्व रोखून शांतताप्रिय हिंदूंना सुरक्षितता प्रदान करणे आवश्यक आहे. यासाठी या सर्व हिंसाचाराला उत्तरदायी असणार्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत कामत यांना देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेनेचे श्री. महांतेश देसाई, श्री. तुकाराम मरगाळे, श्री. विकास चव्हाण, धर्मप्रेमी सर्वश्री रघुराज चौगुले, सचिन पाटील, दयानंद पाटील यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून खोटा गुन्हा नोंद करून त्यांना १ ऑगस्टला अटक करण्यात आली आहे. तरी श्री. धनंजय देसाई यांना षड्यंत्रकारी आरोपातून त्वरित मुक्त करावे, या मागणीचे निवेदनही या वेळी देण्यात आले.