धर्माचरण करणारा यवतमाळ येथील सनातनचा बालसाधक कु. मयंक संजय सिप्पी (वय १२ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मयंक संजय सिप्पी हा या पिढीतील एक आहे !
यवतमाळ, ३० ऑगस्ट (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारा कु. मयंक संजय सिप्पी (वय १२ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी घोषित केले. पू. पात्रीकरकाका यांनी त्याला भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला. या वेळी कु. मयंकचे वडील संजय सिप्पी आणि आई सौ. मनीषा सिप्पी, तसेच जिल्ह्यातील साधक उपस्थित होते.
या आनंद सोहळ्यात अनेकांची भावजागृती झाली. ‘मयंककडे पाहून कसे वाटते ?’, असे पू. पात्रीकरकाकांनी विचारल्यावर अनेक साधकांनी ‘चांगले वाटते’, ‘आनंद जाणवतो’, ‘प्रसन्न वाटते’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. मयंक संजय सिप्पी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. मयंकविषयी जाणवलेले सूत्र !
गेल्या ३-४ मासांपासून मयंकमध्ये पुष्कळ पालट जाणवत आहे. तो शांत आणि स्थिर झाल्याचे जाणवत आहे. पू. पात्रीकरकाकांनी मयंकला बोलावले असल्याचे समजल्यावर ‘त्याची आध्यात्मिक पातळी घोषित होईल’, अशी पूर्वसूचना मिळाली. – सौ. सोनल करोडदेव, यवतमाळ
चि. मयंक संजय सिप्पी याची त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. आनंदी
‘कु. मयंक नेहमी हसतमुख आणि आनंदी असतो.
२. व्यवस्थितपणा
त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा हा गुण आहे.
३. आवड-नावड नसणे
त्याला खाण्यापिण्याविषयी आवड-नावड नाही.
४. प्रेमभाव
त्याच्या बोलण्यातून प्रेमभाव जाणवतो. तो नेहमी इतरांचा विचार करतो.
५. समंजस
‘मी किंवा त्याची आई घरी नसलो, तरी तो चिडचिड करत नाही. ‘आईने आपल्याला वेळ द्यावा’, असे त्याला वाटत नाही. तो इतर मुलांप्रमाणे बाहेर जाऊन खेळण्याचा हट्ट करत नाही. तो घरी एकटाच खेळतो.
६. परिस्थिती स्वीकारणे
मयंक लहानपणापासून वर्तमान परिस्थितीचा स्वीकार करतो.
७. धर्माचरण करणे
अ. तो नेहमीच सकाळी अंघोळ केल्यावर टिळा लावतो.
आ. तो सकाळी आणि संध्याकाळी उदबत्ती आणि दिवा लावून श्लोक म्हणतो.
इ. कुठे देवतांची चित्रे पडली असतील, तर तो आपल्या शाळेच्या दप्तरात ठेवून घरी आणून अग्नीत समर्पित करण्यासाठी देतो.
८. व्यष्टी साधना
तो नियमित नामजप आणि आत्मनिवेदन करतोे. तो मोरपीसाने आवरण काढतो. तो प्रतिदिन आढावा देतो. तो श्रीकृष्णाशी बोलून त्याला स्वतःला येणार्या अडचणी सांगतो. तो त्याचे नामजपादी उपाय वेळेत पूर्ण करतो.
९. चुकांचे गांभीर्य
मयंककडून चूक झाल्यावर तो परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर उभा राहून कान पकडून क्षमायाचना करतो.
१०. समष्टी सेवा
तो प्रत्येक मासात यवतमाळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी होतो आणि त्वेषाने घोषणाही देतो.
११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
अ. तो गुरुदेवांच्या अनुसंधानात राहूनच अभ्यास आणि दिवसभराचे नियोजन करतो.
आ. तो गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी सात्त्विक आचरण करतो.
इ. मयंकला नेहमी ‘गुरुदेव त्याच्या सवमेत आहेत’, असे जाणवते. गुरुदेव त्याच्यासाठी सर्वस्व आहेत.
१२. स्वभावदोष
चिडचिडेपणा, मनानुसार करणे, विसराळूपणा.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. संजय बाबुलालजी सिप्पी (वडील) आणि सौ. मनीषा संजय सिप्पी (आई), यवतमाळ.