भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील लाचखोर मुख्य लिपिक कह्यात !
ठाणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) – गृहनिर्माण संस्थेला नोटीस बजावणे, व्यवस्थापक नेमणे आणि लेखापरीक्षण करणे यांसाठी भाईंदर येथील उपिनबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक शेख अली हैदर दगडू मिया (वय ३५ वर्षे) याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ठरलेल्या ४५ सहस्र रुपयांच्या लाचेच्या रकमेतील २५ सहस्र रुपयांचा पहिला हप्ता घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला कह्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक)
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि अपक्ष आमदार गीता जैन यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ‘कारभार सुधारा, भ्रष्टाचार बंद करा अन्यथा कारवाई करायला लावू’, अशी चेतावणी दिली होती. (स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही अशी चेतावणी देण्याची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाप्रतिदिन समोर येणारी भ्रष्टाचाराची शेकडो उदाहरणे म्हणजे विकासाकडे वाटचाल करणार्या भारतासाठी कलंकच होय ! |