पिंपरी-चिंचवड येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील चिखली भागात ३० ऑगस्टला पहाटे ‘सचिन हार्डवेअर’ या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात २ लहान मुलांचा समावेश आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ‘शॉर्टसर्किट’मुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर कुटुंब मूळचे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहे. चिमणाराम चौधरी, नम्रता चौधरी, भावेश चौधरी, सचिन चौधरी अशी मृतांची नावे आहेत. घटना घडली तेव्हा चौघेही झोपेत होते. बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने हे कुटुंब आगीत होरपळून मृत्यू पावले.