जिओ आस्थापनाकडून वाई (जिल्हा सातारा) शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी !
सातारा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – केबल टाकणे आणि गळती काढणे या कामांसाठी जिओ आस्थापनाने वाई शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. या कृतीचा समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिओ आस्थापन यांच्याकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू आहे. बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, जिओ आस्थापनेने डिपॉझिट भरून हे काम चालू केले असल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपये खर्च करून रस्ते करायचे, नंतर जिओसारख्या आस्थापनाला अनुमती देऊन रस्ते खोदायचे आणि पुन्हा निविदा काढून रस्ते करायचे, हे निषेधार्ह आहे. यामुळे सामाजिक आणि राजकीय संघटना आंदोलनाच्या सिद्धतेत आहेत.