कारी (जिल्हा सातारा) येथील प्रतीक्षा मोरे यांचा ‘शिवछत्रपती’ पुरस्काराने गौरव !
सातारा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – पुणे येथे झालेल्या ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कारी येथील प्रतीक्षा मोरे यांना मल्लखांब खेळातील कामगिरीविषयी ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री उपस्थित होते.
प्रतीक्षा मोरे या परळी खोर्यातील कारी गावच्या रहिवाशी आहेत. वयाच्या ७ व्या वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्यांनी मल्लखांब या खेळात प्रावीण्य संपादन केले आहे. आतापर्यंत ७ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने ७ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांची प्राप्ती केली आहे.