रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेला गेल्यावर आलेल्या अनुभूती
१. ‘स्वागतकक्षात केर काढण्याची सेवा मिळाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील केर काढत आहे’, असा भाव ठेवणे
‘गुरुदेवांमुळे (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे) मला या वैकुंठरूपी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्याची संधी लाभली. येथे आल्यावर मला स्वागतकक्षात केर काढण्याची सेवा मिळाली. मी केर काढतांना ‘गुरुदेवांच्या खोलीतील केर काढत आहे’, असा भाव ठेवला.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीच्या बाहेर असलेल्या मार्गिकेतील केर काढतांना सुगंध येऊन मन निर्विचार होणे
स्वागतकक्षातील केर काढून झाल्यावर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीबाहेर मार्गिका आहे, तिथेही केर काढायचा होता. ‘त्या मार्गिकेमधील केर काढण्याची सेवा मला मिळाली’, याच भावाने माझे मन कृतज्ञ झाले. मी त्या मार्गिकेत गेल्यावर गुरुदेवांप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटून भावाश्रू येऊ लागले. मार्गिकेमधील केर काढतांना मला सुगंध आला आणि माझे मन निर्विचार झाले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामातेचा जिथे स्पर्श होतो, तिथे एवढे चैतन्य असते’, हे अनुभवता येणे अन् संपूर्ण केर काढून होईपर्यंत त्याच भावस्थितीत रहाता येणे
माझा मनातून ‘कृतज्ञता, कृतज्ञता’ हा नामजप चालू झाला. ‘त्या मार्गिकेमधील चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे’, अशी माझी प्रार्थना होऊ लागली. केर काढतांना मला पुष्कळ उष्णता जाणवत होती; पण मार्गिकेमध्ये गेल्यावर मला गारवा जाणवला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामातेचा जिथे स्पर्श होतो, तिथे एवढे चैतन्य असते’, हे मला अनुभवता आले. संपूर्ण केर काढून होईपर्यंत मला त्याच भावस्थितीत रहाता आले.
‘हे ईश्वरा, ‘केवळ आणि केवळ तुझ्याच कृपेने मला ही सेवा करता आली. त्या सेवेतून आनंद आणि चैतन्य ग्रहण करता आले. मला भावस्थितीत राहून सेवा करता आली. निरनिराळ्या अनुभूती घेता आल्या’, त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– गुरुदेवांचे एक फूल,
कु. जिगिषा दर्शन म्हापसेकर (वय १७ वर्षे), तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.६.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |