पू. कालिचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
शिवजयंतीच्या भाषणात धार्मिक तेढ निर्माण केल्याचे प्रकरण
पुणे – पुणे येथील सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केेलेल्या कार्यक्रमात हिंदु आणि मुसलमान समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, असे भाषण पू. कालिचरण महाराज यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
कालिचरण महाराज उर्फ अभिजीत सराग विरोधात गुन्हा दाखल: शिवजयंती निमित्त केलेल्या भाषणात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न#KalicharanMaharaj
https://t.co/diQ9DS5nwt— Divya Marathi (@MarathiDivya) August 30, 2023
या प्रकरणी येथील सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. पू. कालिचरण महाराज यांनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्र-चकती पोलिसांनी पडताळून पाहिल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.