सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !
पणजी, ३० ऑगस्ट (वार्ता.) – भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राखी बांधण्यात आली. सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.
सनातन संस्थेच्या वतीने राज्यातील मान्यवर व्यक्ती, वेदमूर्ती, लोकप्रतिनिधी, उद्योजक, पोलीस अधिकारी यांनाही राखी बांधण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री केदार नाईक, सांखळी येथील वेदमूर्ती शिवानंद खेडेकर, सांखळी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रामदास तारी, म्हापसा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जिबवा दळवी, ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर, ‘प्राईम टीव्ही’चे संपादक संदीप केरकर यांनाही राखी बांधण्यात आली.