चंद्रावर सापडला प्राणवायू !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या ‘चंद्रयान-३’ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर या रोबोटने चंद्रावर प्राणवायू (ऑक्सिजन) असल्याचे शोधले आहे. यासह या रोव्हरला त्याला चंद्रावर ८ खनिजेही सापडली आहे.
BIG BREAKING NEWS – Chandrayaan 3 detects Oxygen on moon🔥🔥. Hunt for hydrogen is underway.
Chandrayaan 3 also confirms the presence of sulphur in the lunar surface near the south pole. World is shocked to see MIRACLES ON MOON ✨.
Silicon, Calcium, Iron, Chromium, Titanium,… pic.twitter.com/tpjNBHWHWQ— Times Algebra (@TimesAlgebraIND) August 29, 2023
मुळात ‘इस्रो’ने ‘चंद्रावर पाणी आहे का ?’, हे शोधण्यासाठी ही मोहीम राबवली आहे. चंद्रावर पाणी आहे का ?, हे शोधण्यासाठी आता ‘हायड्रोजन आहे का ?’ हे शोधावे लागणार आहे. चंद्रावर हायड्रोजन सापडले, तर तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होईल. हे ‘चंद्रयान ३’चे मोठे यश असणार आहे. ‘एच्२ओ’ म्हणजे हायड्रोजनचे २ अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांद्वारे पाणी बनते.
चंद्रावर पाणी सापडल्यास काय होईल ?
चंद्रावर पाणी सापडल्यास विविध देशांच्या अंतराळ संस्था अंतराळवीराला चंद्रावर पाठवू शकतील. पिण्यासाठी आणि यंत्र थंड ठेवण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, तसेच श्वास घेण्यायोग्य हवा किंवा इंधन बनवता येईल.
चंद्रावर सापडलेली खनिजे !
चंद्रावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मँगनीज आणि सिलिकॉन खनिजे सापडली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हरवर बसवण्यात आलेल्या ‘लेझर ड्रायव्हन ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ या उपकरणाद्वारे ही खनिजे शोधणे शक्य झाल्याचे ‘इस्रो’ने म्हटले आहे.
‘प्रज्ञान’ने काढले ‘विक्रम’चे छायाचित्र !
‘चंद्रयान-३’च्या ‘प्रज्ञान’ रोव्हरने ‘विक्रम’ लँडरचे छायाचित्र पाठवले आहे. पहिल्यांदाच ‘प्रज्ञान’ने त्याचा कॅमेरा वापरून छायाचित्र काढले आहे.