आंबिवली (कल्याण) येथील ‘एन्.आर्.सी.’ आस्थापनाच्या आवारातील रोहित्राजवळ स्फोट
ठाणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील मोहने भागात नॅशनल रेयॉन आस्थापन (‘एन्.आर्.सी.’) अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहे. एका कंत्राटदाराच्या माध्यमातून तेथील आवारातील रोहित्राची दुरुस्ती चालू असतांना आगीचा भडका उडून मोठा स्फोट झाला. यात अन्वर अहमद आणि गोरख जाधव हे २ कामगार गंभीररीत्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार चालू असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.