डॉ. कुरुलकर पुन्हा पाकसमवेत संपर्क करण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्या जामिनाला विरोध !
पुणे – संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक अन् वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे, तसेच क्षेपणास्त्रे यांची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या भ्रमणभाषमधील माहितीही पुसली. ती माहिती पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू असून त्यांना जामीन दिल्यास ते पुन्हा पाकिस्तानसमवेत संपर्क साधण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे.