हिंदु तरुणासमवेत फिरणार्या मुसलमान तरुणीचा मुसलमान जमावाकडून छळ !
बेंगळुरू – येथील गोविंदपुरा भागात हिंदु तरुणासमवेत फिरल्याचा आरोप करत मुसलमान जमावाने बुरख्यातील एका मुसलमान तरुणीला घेरले आणि तिचा छळ केला. मुसलमान जमावाने तिला ‘इस्लामवरील कलंक’ असे संबोधले. काहींनी या तरुणीवर इस्लाम धर्म अपकीर्त केल्याचा आरोप केला. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
कर्नाटकात कट्टरपंथींचे महिलेसोबत असभ्य वर्तन, म्हणाले – ‘ इस्लामवर कलंक’: #MahaMTB #bengalurupolice #Karnataka https://t.co/s0dWO0cS9p
— महा MTB (@TheMahaMTB) August 28, 2023
याविषयीच्या एका अहवालात म्हटले आहे की, हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी असलेल्या जोडप्यांना कट्टरवादी मुसलमानांकडून लक्ष्य केले जात आहे. हिंदु मित्रांसमवेत फिरणार्या मुसलमान महिलांचा छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये हिंदु तरुणांना मारहाणही करण्यात आली आहे. या प्रकरणी मुसलमानांकडून ‘भगव्या प्रेमाचा सापळा’ नावाने अपप्रचार केला जात आहे. या कटाच्या अंतर्गत मुसलमान महिलांना हिंदु पुरुषांसमवेत फिरण्यापासून रोखले जात आहे.
संपादकीय भूमिकाअशा मुसलमानांचा जमाव लव्ह जिहादविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या ! |