‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !
चिपळूण, २९ ऑगस्ट (वार्ता.) – ‘हलालमुक्त भारत अभियाना’च्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा चालू आहे. या दौर्याच्या अंतर्गत चिपळूण येथे जाहीर व्याख्यानानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हलाल प्रमाणपत्र आणि अर्थव्यवस्था यांचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ या अभियानाचा चिपळूण येथून प्रारंभ करण्याचा संकल्प केला. या दृष्टीने चिपळूण येथील पत्रकारांना माहिती देण्यासाठी शहरातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या वेळी श्री. रमेश शिंदे, चिपळूण येथील मनसेचे शहराध्यक्ष अभिनव भुरण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, शहराध्यक्ष आशिष खातू, विश्व हिंदु परिषदेचे पराग ओक, समितीचे श्री. सुरेश शिंदे, खेड येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिराचे विश्वस्त रमेश कांजी नंदा उपस्थित होते. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकारांना हलाल अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम सांगितले. त्याचसमवेत हलाल अर्थव्यवस्था रोखण्यासाठीच्या उपाययोजनाही सांगितल्या.
रमेश शिंदे म्हणाले की,
१. गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे.
२. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि इस्लामी देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत.
३. भारत सरकारच्या अधिकृत ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (FDA) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल’ प्रमाणिकरणाची आवश्यकताच काय ?
४. आज ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गर किंग’ ‘पिझ्झा हट’ यांसारखी नामवंत आस्थापने हिंदु, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. भारतातील १५ टक्के मुसलमान समाजासाठी ८० टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती का ?
निजी इस्लामी संस्थाओं को ‘हलाल प्रमाणपत्र’की अनुमति न दी जाए ! – @Ramesh_hjs, राष्ट्रीय प्रवक्ता, हिन्दू जनजागृति समिति
भारत में सरकार की ‘FSSAI’ एवं ‘FDA’ जैसे खाद्यपदार्थाें का प्रमाणीकरण करनेवाली सरकारी संस्थाओं के होते हुए #Halal के नाम पर समांतर इस्लाम धर्म पर आधारीत… pic.twitter.com/ngenL5UAfP
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) August 27, 2023
क्षणचित्रे
१. मनसेचे शहराध्यक्ष अभिनव भुरण यांनी ‘चिपळूण मधील सर्व व्यापार्यांची आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची लवकरच बैठक घेऊन या संदर्भातील पुढील कृतीचे नियोजन करणार आहोत’, असे सांगितले.
२. भाजपचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ मोहिमेस आमचे सहकार्य राहील’, असे प्रतिपादन केले.
३. पत्रकारांनी या मोहिमेच्या संदर्भात प्रश्नोतरे विचारून शंका समाधान केले. तसेच ‘हलालमुक्त भारत’ या अभियानाच्या संदर्भात जाणून घेतले.
‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?
इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरता मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे .
संपादकीय भूमिकाअसे अभियान राबवण्याचा निश्चय करणारे व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन ! |