हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार : माजी खासदाराचा मुलगा दानिश अखलाक याला अटक !
देहलीत ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
नवी देहली – देहलीतील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिकणार्या हिंदु विद्यार्थिनीने माजी खासदार शाहिद अखलाक यांचा मुलगा दानिश अखलाक याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीच्या आधारे परतापूर पोलिसांनी दानिश याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Uttar Pradesh: Former BSP MP Shahid Akhlaq’s son Danish Akhlaq arrested in connection with the rape of a Delhi girlhttps://t.co/XI0X06JQBv
— OpIndia.com (@OpIndia_com) August 26, 2023
पीडित हिंदु विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट या दिवशी दानिश अखलाकने तो अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमाद्वारे मैत्री केली. त्यानंतर २२ ऑगस्टला त्याने तिला हौज खास येथील रेस्टॉरंटमध्ये बोलावले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा बलपूर्वक अश्लील व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी दिली.
आरोपीच्या तावडीतून सुटका करून पीडित विद्यार्थिनी घरी पोचली. दुसर्या दिवशी तिने परतापूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु महिलांसाठी संकट बनलेल्या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी कुठलेही पोलीस आणि प्रशासन काहीही करत नाहीत, तसेच लोकप्रतिनिधीही याविरोधात म्हणावा तसा आवाज उठवत नाहीत, हे संतापजनक ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |