इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी
|
नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलै या दिवशी बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. यात काही हिंदूंचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटने तिच्या ‘व्हॉईस ऑफ खुरासन’ या मुखपत्रात नूंह येथील हिंसाचाराला हिंदूंनाच उत्तरदायी ठरवून सूड उगवण्याची धमकी दिली आहे. तसेच यात ज्ञानवापीचाही उल्लेख करण्यात आला आहे. भारतातील हिंदूंना जिहादसाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. (भारतातील धर्मांधांना चिथावणी देण्याची आवश्यकता नसते, ते तसेही हिंदूंवर आक्रमण करतच असतात, हे नूंह येथील हिंसाचारातून लक्षात येते ! – संपादक) इस्लामिक स्टेटचे हे मुखपत्र ‘टेलिग्राम’ आदी सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केले जाते.
‘Take revenge, burn Hindus alive’ ISIS calls for killing Hindus in its latest magazine, quotes ‘journalist’ Meer Faisal to spread disinformation https://t.co/UPHeE69bBk
— OpIndia.com (@OpIndia_com) August 29, 2023
१. या मुखपत्राच्या मुखपृष्ठावर त्रिशूळ आणि बुलडोझर दाखवण्यात आले आहे. यात बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्याविषयी अपशब्द वापरण्यात आले आहेत. नूंहच्या प्रकरणी गोरक्षक मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी बिट्टू बजरंगी याला अटक केली आहे, तर बजरंग दलाने ‘तो आमचा कार्यकर्ता नाही’, असे घोषित केलेले आहे.
२. हिंदूंच्या चिथावणीखोर व्हिडिओंमुळे ५०० मुसलमानांची घरे पाडण्यात आली आणि याचे समर्थन हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केल्याचा दावा या मुखपत्रात करण्यात आला आहे. यात अनिल विज यांचे नाव घेऊन सूड उगवण्याची धमकी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|