ब्रिटनमध्ये संशोधनाच्या नावाखाली भारतीय वंशाच्या महिलांना खाऊ घातल्या होत्या किरणोत्सर्गबाधित चपात्या !
वर्ष १९६९ मधील घटनेची ५४ वर्षांनंतर चौकशीची मागणी
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाच्या महिला खासदार ताइवो ओवाटेमी यांनी वर्ष १९६९ मध्ये केल्या गेलेल्या वैद्यकीय संशोधनाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या अंतर्गत भारतीय वंशाच्या २१ महिलांना किरणोत्सर्गबाधित चपात्या खाऊ घालण्यात आल्या होत्या. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार महिला स्थलांतरित म्हणून ब्रिटनमध्ये आल्या होत्या. त्यांना संशोधनाशी संबंधित पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. यातून महिलांच्या शरिरातील लोहाची कमतरता भरून निघेल कि नाही ?, याविषयी संशोधन करण्यात येणार होते.
१. कार्डिफ विद्यापिठाचे प्रा. पीटर एलवूड यांनी हे संशोधन केले होते. युनायटेड किंगडमच्या ‘मेडिकल रिसर्च कौन्सिल’ने (‘एम्.आर्.सी.’ने) यासाठी निधी दिला होता. या संशोधनाची माहिती सर्वप्रथम वर्ष १९९५ मध्ये एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या ३ लघुपटांद्वारे उघड झाली.
२. यानंतर ‘एम्.आर्.सी.’ने या प्रकरणाची चौकशी केली आणि संशोधनात महिलांच्या आरोग्याला अतिशय अल्प धोका असल्याचे आढळून आले. ‘या महिलांना संशोधनासाठी बोलावल्यावर त्यांनी ‘कोणत्या विषयावर संशोधन केले जात आहे ?’, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पुष्कळ प्रयत्न करूनही ‘त्यांच्यावर कशाची चाचणी केली जात आहे ?’, हे समजले नाही.
३. ताइवो ओवाटेमी यांनी म्हटले आहे की, ज्या महिलांवर हे संशोधन करण्यात आले, त्यांची मला काळजी वाटते. ‘सप्टेंबरमध्ये संसदेचे अधिवेशन चालू होताच या प्रकरणी चर्चेची मागणी करणार आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करतांना, ‘असे का घडले ? (महिलांना अंधारात का ठेवले गेले ?)’ या याचा शोध घेतला पाहिजे’, असे त्यांनी म्हटले.
संपादकीय भूमिका
|