श्री गणेशचतुर्थीला ‘जिओ एअर फायबर’ चालू होणार !

मुंबई – ‘५ जी’ नेटवर्क आणि अत्याधुनिक ‘वायरलेस’ सेवा देणारे जिओ आस्थापनाचे ‘एअर फायबर नेटवर्क’ श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी, म्हणजे १९ सप्टेंबरला चालू होणार आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी २८ ऑगस्ट या दिवशी आस्थापनाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. ‘जिओ एअर फायबर’ नेटवर्कद्वारे घरे, कार्यालये आदी ठिकाणी वायलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.

मुकेश अंबानी पुढे म्हणाले, ‘‘असंख्य ठिकाणे आमच्या ‘ऑप्टिकल फायबर’, म्हणजेच ‘जिओ फायबर’शी जोडलेली आहेत. अद्यापही लाखो ठिकाणे आहेत, जेथे वायरद्वारे ‘कनेक्टिव्हिटी’ देणे कठीण आहे. ‘जिओ एअर फायबर’मुळे ही अडचण सुटेल. या सेवेमुळे आम्ही २० कोटी घरे आणि कार्यालये यांच्यापर्यंत पोचू. सद्यःस्थितीत जिओचे ‘ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर’ भारतात १५ लाख किलोमीटरपर्यंत पसरले आहे. ‘ऑप्टिकल फायबर’चे ग्राहक प्रतीमास सरासरी २८० जीबीहून अधिक ‘डेटा’ वापरतात. जिओच्या भ्रमणभाषच्या ‘डेटा’चा वापर याच्या १० पट अधिक आहे.’’