ठाणे येथे छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !
ठाणे, २८ ऑगस्ट (वार्ता.) – बीड येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे २८ ऑगस्टला दहन केले. त्याला अजित पवार गटाने प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.