कल्याण रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामानाची चोरी करणार्या दोघांना अटक !
कल्याण – येथे रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामानाची चोरी करणारे दिनेश निनावे (वय ३३ वर्षे) आणि संतोष चौधरी (वय ३५ वर्षे) यांना रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ६ भ्रमणभाष संच असा ४ लाख १४ रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. मे मध्ये या चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला असून ३ मासांनंतर त्यांना पकडण्यात आले. मे २०२३ मध्ये कल्याण रेल्वेस्थानकातून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चढतांना एका प्रवाशाची सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरीला गेली होती. त्या वेळी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सीसीटीव्ही चित्रण पाहून पोलिसांनी वरील कारवाई केली.
चोरीच्या प्रकरणात कठोर शिक्षा होत नसल्यानेच चोरांचे फावते, हे पोलिसांच्या कधी लक्षात येणार ? |