आजपासून भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

श्री महालक्ष्मी देवस्थान, कोल्हापूर

कोल्‍हापूर – कोरोना महामारीच्‍या काळापासून गेले ३ वर्षे साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पितळ्‍या उंबर्‍यातून आतून बंद करण्‍यात आले होते. हे दर्शन २९ ऑगस्‍टपासून भाविकांना चालू करण्‍यात येत आहे. गर्दीचे दिवस वगळता भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली.

वर्ष २०२० मध्‍ये कोरोना संसर्गाच्‍या काळात श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांना काही नियम आणि अटी घालण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यात पितळी उंबर्‍याच्‍या आतून दर्शन बंद करून शंखतीर्थ येथील चौकातून मुखदर्शन चालू करण्‍यात आले होते. कोरोना संसर्गाचा प्रभाव अल्‍प झाल्‍यावरही हे दर्शन पूर्ववत् करण्‍यात आले नाही. त्‍यामुळे पितळी उंबर्‍याच्‍या आतून दर्शन चालू करण्‍याची मागणी वारंवार भाविकांकडून करण्‍यात येत होती. शेवटी ही मागणी आता मान्‍य करण्‍यात आली आहे.