मणीपूरमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाला कुकी संघटनांचा विरोध

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये २९ ऑगस्टपासून चालू होणार्‍या विधानसभेच्या अधिवेशनाला कुकी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. ‘इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम’ (आय.टी.एल्.एफ्.) आणि ‘कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ (सीटीयू) यांनी २८ ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या चालू असलेल्या हिंसाचारावराची स्थिती पूर्ववत होईपर्यंत २९ ऑगस्ट या दिवशी होणारे विधानसभेचे अधिवेशन स्थगित करण्यात यावे. २९ ऑगस्टला अधिवेशन बोलावणे अयोग्य आहे; कारण सध्याची परिस्थिती कुकी समुदायातील आमदारांच्या सहभागासाठी अजिबात अनुकूल नाही.


मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी २९ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.