मणीपूरमध्ये ३० टक्के असणार्या ख्रिस्ती धर्मीय कुकी समाजाकडून होत आहे स्वतंत्र राज्याची मागणी !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या ४ मासांपासून हिंसाचार चालू आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. आता मणीपूरचे विभाजन करून वेगळे ‘कुकीलँड’ राज्य स्थापन करण्याची मागणी ख्रिस्ती धर्मीय असणार्या कुकी समाजाकडून केली जात आहे. ‘मैतेई समाजासमवेत रहाणे आमच्यासाठी मृत्यू समान आहे’, असे कुकी समाजाचे म्हणणे आहे. मैतेई समाज हा हिंदु धर्मीय आहे. मणीपूरची एकूण लोकसंख्या २८ लाख ५० सहस्र आहे, त्यापैकी ३० टक्के कुकी नागरिक आहेत.
मणिपुर में जातीय हिंसा जारी है। लोग रिलीफ कैंपों से घर लौटना चाहते हैं, पर कुकी लोगों का कहना है कि मैतेई के साथ रहना मौत के समान है। इसीलिए मणिपुर में एक अलग कुकीलैंड राज्य की मांग जोर पकड़ रही है। #Manipur
पूरा वीडियो देखने के लिए लिंक पर क्लिक करें- https://t.co/FHjzJYKHzJ pic.twitter.com/o9GrCPK8wz— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) August 28, 2023
१. वर्ष १९७२ मध्ये मणीपूर पूर्ण राज्य बनल्यानंतर वर्ष १९८० मध्ये स्वतंत्र कुकीलँडची मागणी करण्यात आली. त्या वेळी कुकी आणि झोमी बंडखोरांची पहिली आणि सर्वांत मोठी संघटना ‘कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन’ची स्थापना झाली.
२. वर्ष २०१२ मध्ये ‘तेलंगाणा’ राज्याची मागणी मान्य होणार, हे कळताच ‘कुकी राज्य मागणी समिती’ या संघटनेने ‘कुकीलँड’साठी आंदोलन करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ही संघटना वेळोवेळी संप आणि बंद पुकारत मणीपूरमध्ये मालवाहतूक रोखण्याचे काम करत आहे.
३. मणीपूर २२ सहस्र ३२७ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक, म्हणजे १२ सहस्र ९५८ चौरस किमी क्षेत्रात कुकीलँड बनवण्याची मागणी या संघटनेने केली आहे.