चोरीची दुचाकी आणि भ्रमणभाष विक्री करणार्या चोराला पोलिसांनी केली अटक !
सातारा, २७ ऑगस्ट (वार्ता.) – चोरीची दुचाकी आणि भ्रमणभाष यांची विक्री करण्यासाठी येणार्या चोराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. राज सुखदेव चौगुले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक दुचाकी आणि एक भ्रमणभाष शासनाधीन करण्यात आला आहे.
आरोपीने कराड तालुक्यातील पाली येथील एका पान विक्रेत्याजवळून भ्रमणभाष चोरल्याची माहिती दिली. आरोपीकडून २५ सहस्र रुपयांची दुचाकी आणि ७ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष, तसेच ३२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे. दुचाकी चोरीच्या प्रकरणात उंब्रज पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते. आरोपी चौगुले हा दिव्यनगरी परिसरामध्ये चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दिव्यनगरी-कोंडवे रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला होता.