मुंबईत १ सप्‍टेंबरपासून म्‍हशीच्‍या दुधाच्‍या दरात वाढ !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – येथे १ सप्‍टेंबरपासून १ लिटर म्‍हशीचे सुटे दूध (रिटेलमध्‍ये) २ ते ३ रुपयांनी महागणार आहेत. होलसेल दरातही २ रुपयांनी वाढ होणार आहे. दूध विक्रेत्‍यांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे.  जनावरांच्‍या चार्‍याच्‍या दरात वाढ झाली असल्‍याने त्‍याचा परिणाम दूध उत्‍पादकांवर होत आहे. परिणामी दुधाच्‍या दरात वाढ झाली आहे.

सध्‍या म्‍हशीच्‍या सुट्या १ लिटर दुधाचा दर ८५ रुपये आहे. हा दर आता ८७ रुपये होईल.