‘हर घर सावरकर’ अभियानातून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचा जागर ! – राजेश क्षीरसागर

स्‍वातंत्र्यवीर सावरकर

कोल्‍हापूर – स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम आणि हिंदुत्‍वाचे विचार आपल्‍यामध्‍ये नेहमीच उत्‍साह आणि देशप्रेम जागवतात. अत्‍यंत प्रेरणात्‍मक विचार स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंमध्‍ये रूजवले. याच विचारांचा जागर ‘हर घर सावरकर’ या संकल्‍पनेतून करण्‍यात येणार आहे. या अनुषंगाने ३१ ऑगस्‍टला रात्री ७ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे ‘सागरा प्राण तळमळला’, या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी जिल्‍हाप्रमुख श्री. सुजित चव्‍हाण, उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, सर्वश्री शिवाजी जाधव, रणजीत जाधव, प्रसाद चव्‍हाण, गणेश रांगणेकर यांच्‍यासह शिवसेना पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्‍थित होते.