सद़्‍गुरु गाडगीळकाका (सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ), साधनेसाठी द्या आम्‍हा आशीर्वाद ।

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

श्री गुरुचरणांचा ध्‍यास मनी घेऊनी ।
आलात तुम्‍ही गुरूंच्‍या (टीप) आश्रमी ॥ १ ॥

कु. मोक्षदा कोनेकर

पदोपदी करूनी गुरुआज्ञापालन ।
धरले तुम्‍ही सतत गुरुचरण ॥ २ ॥

प्रेमभावाने सर्वांना केले आपलेसे ।
म्‍हणूनी तुमच्‍यामध्‍ये आम्‍हा गुरुमाऊली दिसे ॥ ३ ॥

तुम्‍ही तर आहात साधकांसाठी संजीवनी ।
कृतज्ञ आहोत आम्‍ही, तुम्‍ही आलात आमच्‍या जीवनी ॥ ४ ॥

गुरूंचे मन जिंकूनी झालात तुम्‍ही सद़्‍गुरु ।
तसे आमचेही प्रयत्न व्‍हावेत, यासाठी आम्‍ही काय करू  ॥ ५ ॥

आमचे लाडके आहात तुम्‍ही सद़्‍गुरुकाका ।
आमचा हात धरूनी घेऊन जा आम्‍हा गुरुचरणी आता ॥ ६ ॥

तुम्‍हीच आहात आधार आम्‍हा साधकांचा ।
तुमच्‍या स्‍मरणानेच येतो आम्‍हा उत्‍साह साधनेचा ॥ ७ ॥

कशी व्‍यक्‍त करू तुमच्‍या चरणी कृतज्ञता ।
‘साधनेसाठी द्या आम्‍हा आशीर्वाद’ हीच प्रार्थना सद़्‍गुरु काका  ॥ ८ ॥

टीप – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या

– कु. मोक्षदा मयुरेश कोनेकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १२ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक