सद़्‍गुरु माई कृपा करी ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सद़्‍गुरु माई (टीप १) कृपा करी, विश्‍वभरात भ्रमण करी ।

कु. प्रतीक्षा हडकर

विश्‍वंभराला (टीप २) भेटण्‍या येई ।
रामनाथी मंदिरात (टीप ३) निवास करी ।
विश्‍वरूपात भगवंत दर्शन देई ॥ १ ॥

कृपाळू सद़्‍गुरु माई साधकजनांना भेटूनी ।
भावविभोर होऊन पाही जवळ घेऊनी ।
सतत साधकजनांसी काय देऊ, असे तिच्‍या मनी ।
लक्ष असे सर्वांवरी, भेटून आई आश्‍वस्‍त करी ॥ २ ॥

मायमाऊली (टीप ४) अपरंपार माया करी ।
कुशीत घेऊनी प्रेम करी सर्वांवरी ।
त्‍या प्रेमाचे वर्णन करण्‍या शब्‍द नसे मजपाशी ।
आईचे महत्त्व सांगण्‍या मी आहे रे देवा अपुरी ॥ ३ ॥

टीप १ – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

टीप २ – परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना

टीप ३ – रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात

टीप ४ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक